Ad will apear here
Next
रत्नागिरी पोलिसांतर्फे नऊ नोव्हेंबरला कोस्टल मॅरेथॉन


रत्नागिरी :
रत्नागिरी पोलिसांतर्फे नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी रत्नागिरी पोलीस कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सहा नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. 

सकाळी सहा वाजता मारुती मंदिर सर्कलपासून मॅरेथॉनची सुरुवात होणार असून, जयस्तंभामार्गे भाट्ये किनारा, पावस रस्ता आणि तेथून परत मारुती मंदिर येथील शिवाजी स्टेडियम असा मॅरेथॉनचा मार्ग आहे. 

सामाजिक एकात्मता वाढीला लागण्यासाठी आणि आरोग्यपूर्णतेचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रत्नागिरीकर या नात्याने आपण नेहमीच सर्व जाती, धर्म किंवा प्रत्येक भाषेच्या समुदायामध्ये एकत्र उभे राहिलो आहोत. रत्नागिरी पोलीस कोस्टल मॅरेथॉनमध्ये सर्वांनी भाग घेवून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींविरुद्ध आपली एकता दाखवू या, तंदुरुस्त राहण्यासाठीचा संदेश देऊ या. नागरिकांचा पोलिसांच्या कार्यात सहभाग वाढावा, पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय राहावा यासाठीच या मोठ्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीकरांनी यात सहभागी व्हावे,’ असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
पोलीस निरीक्षक अनिल विभूते : ८८०५० ०८०८०
पोलीस निरीक्षक नितीन ढेरे : ९०११९ ९५७७७
महेश गर्दे, जाणीव फाउंडेशन : ९४९२२ ००३१२८

नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करावे. http://ratnagiripolice.co.in/rcmr/
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZYICG
Similar Posts
जागतिक दिव्यांग दिनी रत्नागिरीत समावेशित एकता दौड रत्नागिरी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने तीन डिसेंबर २०१९ रोजी रत्नागिरीत समावेशित एकता दौड आयोजित करण्यात आली होती. ती अत्यंत उत्साहात पार पडली. मूकबधिर, दिव्यांग आणि मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य विद्यार्थीही एकता दौडीत सहभागी झाले होते.
रत्नागिरी जिल्हास्तरीय योग स्पर्धेत आर्य, दुर्वांकूर, प्रांजल, अवंती प्रथम रत्नागिरी : योग सोसायटी व पतंजली योग पीठ परिवारातर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आर्य हरचकर, दुर्वांकूर चाळके, प्रांजल आंबेडे, अवंती काळे या योगपटूंनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
रत्नागिरी पोलिसांतर्फे नवनिर्माण महाविद्यालयात कार्यक्रम रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी येथील नवनिर्माण महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले होते; तसेच ‘शहीद पोलिसांचे व्यर्थ न जावो बलिदान’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहिलीतील स्वरा साखळकरने मिळविले सुवर्णपदक रत्नागिरी : चिपळूण येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहिलीत शिकणाऱ्या स्वरा साखळकर हिने अथक मेहनतीच्या जोरावर क्योरोगी प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language